नगरपंचायत निवडणूक गुहागर येथे महाविकास आघाडी तर्फे मनसे उमेदवारांचे आज अर्ज दाखल

नगरपंचायत निवडणूक गुहागर येथे महाविकास आघाडी तर्फे मनसे उमेदवारांचे आज अर्ज दाखल

आबलोली (संदेश कदम) 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे गुहागर तालुका विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वा खाली आज कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक ४ सौ.कोमल दर्शन जांगळी आणि प्रभाग क्रमांक ५ निशा राजेश शेटे यांनी महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे,असगोली गण उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, वॉर्ड क्रं.३ उपाध्यक्ष दर्शन जांगळी, आकाश जांगळी, शिवसेना शहराध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, जयदेव मोरे,पराग मालप,निरज बागकर,समिर कनगुटकर,राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें