आबलोली येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची बैठक उत्साहात संपन्न

आबलोली येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची बैठक उत्साहात संपन्न

पडवे जिल्हापरिषद गट~ पुन्हा शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार निवडून आणू या, शिवसैनिकांचा एकमुखाने निर्धार.

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठ येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समीती निवडणुकी संदर्भात पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली.

आमदार भास्करशेठ जाधव यांच्या आदेशा प्रमाणे पडवे जिल्हा परिषद गटाची प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली.यावेळी पडवे जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सचिन बाईत आणि पडवे पंचायत समीती गण निवडणूक उमेदवार म्हणून रवी आंबेकर यांच्या नावाला या बैठकीत टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले व मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार‌च असा निर्धार करण्यात आला.

यावेळी हि निवडणूक शिवसेना पक्षासाठी प्रतिष्ठेची असून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका, आपण स्वत:च उमेदवार आहोत असे समजून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करा, अफवांवर विश्वास ठेऊ नका एक एक मतदार जोडा, शिवसेना पक्षाची मशाल निशानी घरा- घरात पोहचवा, वाडी वस्तीवर आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटात मशाल निशानी आणि आमदार भास्करशेठ जाधव यांनी केलेली विकास कामे सांगा वाडी वस्तीवर काय काय समस्या अडचणी आहेत त्या जाणून घ्या आपण आमदार भास्करशेठ जाधव यांच्या माध्यमातून सोडवू आता एकच लक्ष जिल्हा परिषद आणि पचांयत समीतीत आपण जिंकूच या निर्धाराने शिवसैनिकांनी कामाला लागूया असा ठाम निर्धार करण्यात आला.

या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांतशेठ बाईत उर्फ आबा बाईत, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन बाईत,सचिव विलास गुरव, उप तालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, नरेश निमूणकर, विभाग प्रमुख रवी आंबेकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर चंद्रकांतशेठ बाईत उर्फ आबा बाईत, काशिनाथ मोहिते, सचिन बाईत,विलास गुरव, रवी आंबेकर,माजी सभापती सौ.पुर्वीताई निमूणकर, नरेश निमूणकर, शिवसनेचे युवा उप जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, श्रीमती.वनिता डिंगणकर, जगदिश गडदे, सुजित सुर्वे, दिलीप यद्रे आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीला सागर डिंगणकर, धर्मा वेलूंडे, सुषमा रायकर, शालिनी शितप सुनिल जोशी, सदानंद जोशी, विष्णू मोहिते, विनय गोंधळी, राकेश देसाई, प्रथमेश निमूणकर, महादेव आंबेकर, संदिप दिवेकर, संतोष गमरे, रविंद्र सुभाष गावडे, शरद सुर्वे, मंदार कोळवणकर, धनित सुर्वे, संजोग सुर्वे, अशोक नाचरे, रामचंद्र मोरे, तृषांत सुर्वे, विजय भोजने, रत्नाकर सोलकर, विष्णू जोशी, पराग सुर्वे, सुरेश कदम आदी. उबाठा शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

‌‌‌‌

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें