मुंबई पोलीस हेडकॉन्स्टेबल आणि गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र प्रमोद गंगाराम पवार यांचे दु:खद निधन

मुंबई पोलीस हेडकॉन्स्टेबल आणि गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र प्रमोद गंगाराम पवार यांचे दु:खद निधन

दि.१ डिसेंबर २०२५ रोजी आनंदवन बुध्द विहार आबलोली येथे पुण्यानुमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभेचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात तन मन धनाने स्वत:ला झोकून देणारे बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली या धम्म संघटनेचे सल्लागार तसेच आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली या धम्म संघटनचे‌ विश्वस्त आणि पाऊल निर्मित नाट्य संस्था आबलोली मुंबई या नाट्य संस्थेचे कलाकार, दिग्दर्शक,दानशूर व्यक्तीमत्व गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र आणि मुंबई पोलिस‌ दलातील हेडकॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचे बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:३० वाजता मुंबई येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.निधना समय त्यांचे वय ५१ वर्षे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी,१ मुलगा, १ मुलगी,बहिण,भाऊ, भावजय, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गंगाराम पवार यांचा पुण्यानुमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक ५० आबलोली या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.या संपूर्ण धम्म संस्कार आणि आदरांजली सभेला सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे जाहिर आवाहन बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र.५० आबलोली, आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली या धम्म संघटना‌ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें