* योगीराज गगनगिरी महाराजांचे खोपोलीतील आश्रमात दत्तजयंती उत्सवाचे भव्य आयोजन!
नवीमुंबई (मंगेश जाधव)
दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गगनगिरी महाराज यांचे खोपोली (रायगड )येथील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या,चैतन्यदायी समाधी स्थानी, अर्थात योगाश्रम येथे दत्तजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने दत्तजयंती दिनी म्हणजेच गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी पहाटेपासून समाधी स्थानी धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होणार असून सकाळी दत्त झोळीचा कार्यक्रम पार पडणार आहे. नतंर होमहवन- भंडारा झाल्यावर दुपारी आश्रमापासून गगनगिरी गुहेपर्यंत ढोल-ताशेचे गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल,तदनतंर सायंकाळी दत्त जन्मावर कीर्तन झाल्यावर,श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.
सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रमस्थानी भजन -पूजन- कीर्तन नामस्मरण -लघुरुद्र -दत्तझोळी- होम हवन -भंडारा व पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमाचे भव्य प्रमाणावर आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल.
तरी जास्तीत- जास्त भाविकांनी या स्थानी येऊन,सक्रिय सहभाग घेऊन,स्वामी गगनगिरी महाराजांचे व दत्त महाराजांचे दर्शन- आशीर्वादाचा लाभ घ्यावा व सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन आश्रम संस्थेतर्फे करण्यात आले आहे.















