निर्मल ग्रामपंचायत झोंबडी यांच्या वतीने झोंबडी काजळीवाडी येथे सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हँडवॉशचे वाटप

निर्मल ग्रामपंचायत झोंबडी यांच्या वतीने झोंबडी काजळीवाडी येथे सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हँडवॉशचे वाटप

आबलोली (संदेश कदम)

निर्मल ग्रामपंचायत झोंबडी या ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथे आरोग्य शिबिरात झोंबडी काजळीवाडी येथील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केल्यानंतर ग्रामस्थांना आणि लहान मुलांना निर्मल ग्रामपंचायत झोंबडी यांच्या वतीने सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हॅन्डवॉशचे वाटप करण्यात आले

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तळवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिम कुमार कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश मोहिते, आरोग्य निरीक्षक मदन जानवळकर, आरोग्य सेवक वैभव जाधव, विकास दुपटे, अजय हळये, विशाल चव्हाण, आरोग्य सेविका मोहिनी पानगले, अक्षता पाणकर, आशा सेविका मिनल घोणसे पाटील, पूजा कदम, उर्मिला बाईत, साक्षी सरदेसाई, उपकेंद्र मदतनीस ग्रीष्मा जाधव, वाडी अध्यक्ष सुरेश पालशेतकर, झोंबडी काजळीवाडी उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नितीन आंबोवकर, सचिव राकेश शिरकर, उत्कर्ष सेवा महिला मंडळ अध्यक्ष सुषमा पालशेतकर, झोंबडी ग्रामपंचायत अधिकारी गोरखनाथ सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक गायकवाड, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य जैनब ममतुले, मयुरी लांजेकर, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता शिरीष पापरकर आदी. उपस्थित होते. यावेळी सरपंच अतुल लांजेकर यांनी ग्रामस्थांना आरोग्या बाबत घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता अभियाना बाबत मौलिक मार्गदर्शन केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें