गुहागर तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन – कार्यक्रम संपन्न

गुहागर तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन – कार्यक्रम संपन्न

दिनांक: ३ डिसेंबर २०२५

स्थळ: जि प शाळा जानवळे नं.१

: समावेशित शिक्षण समग्र शिक्षा पंचायत समिती शिक्षण विभाग गुहागर मा. गटविकास अधिकारी भिलारे साहेब पं स गुहागर व मा. गटशिक्षणाधिकारी गळवे साहेब पं स गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली

३ डिसेंबर हा संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला जागतिक दिव्यांग दिन आहे. दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांबद्दल जनजागृती वाढवणे, त्यांचा सहभाग, समावेश आणि स्वावलंबन यांचे महत्त्व समाजापुढे मांडणे हा या दिनाचा उद्देश आहे. यानिमित्ताने आमच्या संस्थेत विविध उपक्रमांनी समृद्ध असा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती. घोरपडे मॅडम, श्री.कदम सर अध्यक्ष दिव्यांग शिक्षक संघटना गुहागर, श्री. बेलेकर सर अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती गुहागर, श्रीमती शिंदे मॅडम वरवेली नं.२ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विशेष शिक्षक श्री लांडे सर श्रीम. मोहिते श्री साखरे सर शिक्षक कांबळे सर पवार मॅडम संगमिस्कर मॅडम सर्व पालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत तसेच समावेशक शिक्षणाची गरज यावर त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.RPWD ACT 2016 – मार्गदर्शन अधिनियम २०१६ (Rights of Persons with Disabilities Act – 2016) बद्दल माहितीपर सादरीकरण करण्यातआले.दिव्यांगव्यक्तींचेअधिकारशिक्षण,रोजगार व सवलती प्रमाणपत्र प्रक्रिया

सरकारी योजनायांची माहितीपालक व विद्यार्थ्यांना देण्यात आली.दिव्यांग विद्यार्थी* चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,ग्रीटिंग तयार करणे इत्यादी विविध उपक्रम घेऊन मुलांच्या गुणांना चालना दिली.कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन करण्यातआले.सर्वउपस्थितांचेसहकार्याबद्दल अभिनंदन व्यक्त bकरण्यात आले. कार्यक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थी, पालक वशिक्षकयांच्यातजागरूकता, आत्मविश्वास आणि समावेशकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें