वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

📰 वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
🔹 रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त; दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत

मुबंई ~महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारतील. दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य गृह विभागाकडून सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये सदानंद दाते यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते आणि शेवटी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.

या नियुक्तीमुळे महाराष्ट्र पोलिस दलात नव्या नेतृत्वाखाली पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल व कार्यशैलीत गती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें