सडे जांभारी येथे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे महेश नाटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सडे जांभारी येथे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे महेश नाटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम )

गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील देऊळवाडी – मावळतवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन शिवसेना पक्षाचे गुहागर तालुक्यातील प्रभावी नेतृत्व आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

या भूमी पूजनाच्या प्रारंभी रस्त्याच्या कामाचा आराखडा, नीतीची तरतूद याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे विधिवत पूजा करून महेश नाटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याने विद्यार्थी, शेतकरी, मजूरीकरणारे मजूर यांचे सह ग्रामस्थांना व आजारी रुग्णांना गाडीने प्रवास करण्यासाठी मोठा लाभ होणार आहे. रस्त्याच्या कामामुळे या गावातील परिसरातील सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करून महेश नाटेकर यांनी गावाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्ते ही एक प्राथमिक गरज ओळखून आम्ही वेळेत आणि गुणवत्ता रीतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे स्पष्ट मत महेश नाटेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थ कृष्णा वेलुंडे, शंकर वेलुंडे, गणपत वेलुंडे, पांडुरंग बारस्कर, मधुकर वेलुंडे, नामदेव वेलुंडे, गोविंद वेलुंडे, संतोष वेलुंडे, सुनिता वेलुंडे, प्रीती वेलुंडे, वनिता वेलुंडे, वृषाली वेलुंडे, समीक्षा वेलुंडे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम निवाते, विजय वैद्य,प्रदीप सुर्वे, विजय मोहिते यांचे सह महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]