दापोलीत सरोदे समाज युवा संघटनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

दापोलीत सरोदे समाज युवा संघटनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

दापोली ~वार्ताहर 
दि. 7 डिसेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वाचे काम सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर यांनी केले. त्याला अपेक्षा पेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला.
दापोली तालुक्यातील सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर तर्फे ए जी हायस्कूल दापोलीच्या माधव कोकणे सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील तब्बल 280 गरजू लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य विषयक तपासणी करून घेतली आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. या शिबिराच्या औपचारिकतेचा उद्घाटन समारंभ दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए जी हायस्कूल शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, नारायण भागवत, आप्पासाहेब आयरे, उमेश भागवत, सदाशिव रसाळ, राजाराम घोडेराव आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पाडला या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी अस्थिघनता (हाडांचे ठिसूळता तपासणी), डोळे तपासणी दंत तपासणी, ईसीजी तपासणी तसेच मधुमेह रुग्णांची सविस्तर तपासणी करण्यात आली आणि तज्ञ डॉक्टरांकडून उपचारात्मक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले शिवाय विशेष बाब म्हणजे रुपये तीन हजार पर्यंतच्या रक्त तपासण्या आणि तीन दिवसांची औषधे मोफत देण्यात आली.
सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संतोष इदाते सचिव संदीप क्षीरसागर सहसचिव डॉ. विनोद घोडेराव खजिनदार भरत रसाळ, स्वप्निल धुमाळ, संदेश यादव, शुभंकर यादव, प्रवीण आयरे, संतोष क्षीरसागर सल्लागार डॉ. तुषार भागवत, हिराचंद आयरे, संजय कारंडे यांच्यासह समाज बांधव तसेच हितचिंतक मित्रमंडळींनी प्रचंड मेहनत घेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करून गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें