शीर- महालक्ष्मी येथे समता फाउंडेशनतर्फे १२ डिसेंबरला मोफत नेत्रतपासणी शिबिर
शीर महालक्ष्मी (सुजित सुर्वे ता. गुहागर) :
गुहागर तालुक्यातील शिर येथे,समता फाउंडेशन आणि भ.क.ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण तसेच संकल्प क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत शीर कुणबी ग्रामस्थ मंडळ सभागृहात होणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची सर्व प्रकारची नेत्र तपासणी विनामूल्य केली जाणार असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना डेरेवण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच ने-आन, राहण्याची व जेवणाची सुविधा रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना पुढील तारखेची पावती शिबिरातच दिली जाईल.
शिबिराचे मार्गदर्शन श्री. मंगेशजी मते यांच्या सहकार्याने करण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.














