श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर, गासकोपरी (विरार पूर्व) येथे स्वामी चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन ⭐

⭐ श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर, गासकोपरी (विरार पूर्व) येथे स्वामी चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन ⭐

विरार (पूर्व), दि. ७ डिसेंबर २०२५ :

श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर, गासकोपरी (विरार पूर्व) येथे रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी ‘श्री स्वामी समर्थ चषक’ या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा पहिला सिझन उत्साहात पार पडला.

स्पर्धेची सुरुवात सकाळी ७ वाजता दीप प्रज्वलनाने झाली. राष्ट्रगीतानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन सोहळा पार पडला. श्री स्वामी सेवेकडून अन्नदान, गरजूंना मदत, सेवेत असलेल्या माउलींसाठी मोफत रक्तदान शिबीर अशा समाजोपयोगी कार्यांची परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातूनही पुढे रेटण्यात आली.

यंदाच्या स्पर्धेत विशेष आकर्षण होते—पहिल्यांदाच क्रिकेट मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या स्वामी सेवेकरी भगिनींचा सहभाग! आयोजकांनी सर्व भक्तगण व सेवेकऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

🏏 १६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग — गाव ते गाव, वाडी ते वाडी स्पर्धा

गासकोपरीच्या भव्य मैदानावर रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १६ संघांनी हजेरी लावली. रोखीची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली होती—

विजेता संघ : ₹ ११,१११/- व चषक

उपविजेता संघ : ₹ ७,७७७/- व चषक

🏆 विजेते व मानकरी खेळाडू

प्रथम क्रमांक विजेता:

आर्वी ११ क्रिकेट संघ (कर्दे, गुहागर)

बेस्ट फलंदाज: रोशन चाळके

मालिकावीर: शर्मन येद्रे

उपविजेता:

निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तवसाळ तांबडवाडी, गुहागर)

बेस्ट गोलंदाज: स्वप्निल घाणेकर

दोन्ही संघांना रोख रक्कम व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. मैदानात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला आणि स्पर्धा उत्साहात पार पडली.

🙏 कार्यक्रमाची सांगता

संपूर्ण दिवसभर चाललेल्या क्रिकेट महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या सर्व क्रिकेट रसिक, भक्तगण व सेवेकऱ्यांचे आयोजकांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें