अंजनवेल केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा १५ डिसेंबर पासून

अंजनवेल केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा १५ डिसेंबर पासून

गुहागर तालुक्यात हिवाळी क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी क्रीडा नगरीमध्ये संपन्न होणार आहेत

.सदर क्रीडा स्पर्धेसाठी पालक ,ग्रामस्थांकडून कबड्डी, खोखो, लंगडी, लांब उडी ,उंच उडी, गोळाफेक, थाळी फेक ,धावणे, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी चांगल्या प्रकारची मैदाने तयार करण्यात आलेली आहेत.सोमवारी दिनांक १५ डिसेंबर२०२५ रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.तरी सदर क्रीडा स्पर्धा करता आपण वेळेत उपस्थित राहावे व क्रीडा स्पर्धकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन क्रीडा समिती केंद्र अंजनवेल यांचे मार्फत करण्यात आलेले आहे,. सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते उपविजेते स्पर्धकांना चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें