शिव उद्योग संघटनेतर्फे महिलांच्या चपाती उद्योगाला नवी दिशा : रोजगार गावात – प्रगती महाराष्ट्रात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिव उद्योग संघटनेतर्फे महिलांच्या चपाती उद्योगाला नवी दिशा : रोजगार गावात – प्रगती महाराष्ट्रात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिव उद्योग संघटनेतर्फे महिलांनी स्वतःच्या हाताने, घरगुती पद्धतीने तयार केलेल्या ताज्या व दर्जेदार चपात्या १ जानेवारी २०२६ पासून MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) परिसरात रिटेल तसेच होलसेल स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या घरगुती उद्योगाला व्यावसायिक स्तरावर नवी संधी मिळणार आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. घरबसल्या उद्योग करून महिलांना सन्मानजनक उत्पन्न मिळावे, यासाठी शिव उद्योग संघटनेने हा अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत स्वच्छता, गुणवत्ता आणि परंपरागत चव जपून महिलांनी तयार केलेल्या चपात्या हॉटेल, खानावळ, डबेवाल्यांचे व्यवसाय, कॅन्टीन, कार्यालये, हॉस्टेल तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. घरगुती स्वरूपात तयार होणाऱ्या या चपात्यांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

शिव उद्योग संघटनेतर्फे सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, हॉटेल चालक, संस्था आणि सामाजिक संघटनांना महिलांच्या या उपक्रमाला सहकार्य, पाठिंबा आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सहकार्यामुळे हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अनेक कुटुंबांचे आर्थिक भवितव्य सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

“महिला स्वावलंबनातूनच सशक्त महाराष्ट्र” या ध्येयाने प्रेरित होऊन शिव उद्योग संघटना पुढील काळातही महिलांसाठी विविध रोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७०२०५८९३०.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात