चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार तळवली प्रशालेची विद्यार्थी कु आयुषी डाकवे हिला जाहीर

चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार तळवली प्रशालेची विद्यार्थी कु आयुषी डाकवे हिला जाहीर

तळवली (मंगेश जाधव)
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०२५-२६ साठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, ता. गुहागर या प्रशालेची विद्यार्थिनी कु. आयुषी सुभाष डाकवे हिची निवड झाली त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर व शिक्षक वृंद यांनी तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या पुरस्काराबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तीला वर्ग शिक्षक श्री. साळुंके सर, श्री. बागल सर व मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी शनि-रवि. दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या मुलाखतीसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून भगीरथ संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणाऱ्या सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें