महालक्ष्मी रेसकोर्स–कोस्टल रोड परिसरात २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क; विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर

महालक्ष्मी रेसकोर्स–कोस्टल रोड परिसरात २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क; विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर

 

मुंबई :

मुंबईकर नागरिकांसाठी मोठे गिफ्ट ठरणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा विकास आराखडा आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. तब्बल २९५ एकर क्षेत्रफळावर हा भव्यदिव्य प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

 

या सेंट्रल पार्कला भूमिगत मार्गाद्वारे थेट कोस्टल रोड तसेच मेट्रो मार्गांशी जोडण्यात येणार असून, यामुळे रेसकोर्सच्या ऐतिहासिक वारशाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

या भव्य सेंट्रल पार्कखाली सुमारे १० लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांसह कबड्डी, खो-खो यांसारख्या पारंपरिक मराठमोळ्या खेळांसाठीही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 

या प्रकल्पामुळे मुंबईत सुमारे ३०० एकरचे ‘ऑक्सिजन पार्क’ तयार होणार असून, त्यामुळे शहरातील हवेचे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हे सेंट्रल पार्क १२०० मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी ५५० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकल्पांचे डिझाईन प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केल्याची माहिती देण्यात आली.

 

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें