चिन्द्रावळे केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साहात साजऱ्या

चिन्द्रावळे केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साहात साजऱ्या

गुहागर.

दिनांक 19.12.2025 ,कर्दे

रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत चिंद्रवले केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा चिंद्रवले केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रकाश जोगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कर्दे 2 च्या क्रीडा नगरीत संपन्न झाल्या. यावेळी चिन्द्रावले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री मंगेश निंबरे , केंद्रप्रमुख श्री प्रकाश जोगले सर, ग्रामविकास अधिकारी श्री घडशी भाऊ, मुख्याध्यापक श्री शशिकांत दाभोलकर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ तन्वी येद्रे , ग्रामपंचायत सदस्य सौ तेजश्री कांबळे, सौ रमिता पंडये आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. सरपंच श्री मंगेश निंबरे यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. कर्दे 2 शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवर, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक , ग्रामस्थ यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री प्रकाश जोगले सर यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘ सर्व विद्यार्थांनी नियमांचे पालन करून आपला खेळ खिलाडी वृत्तीने दाखवावा , स्पर्धेच्या युगात सातत्यपूर्ण सरावामुळे सुयश प्राप्त होते.’ याबरोबरच सरपंच श्री मंगेश निंबरे, कर्दे ग्रामस्थ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्रातील काही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई मंडळाकडून क्रीडा ड्रेस चे वाटप करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या, उपविजेता संघाला , वयक्तिक क्रिडा प्रकारातील यशस्वी खेळाडूंना ग्रुप ग्रामपंचायत चिन्द्रावले मार्फत प्रमाणपत्र, मेडल्स, शिल्डस देऊन गौरवण्यात आले. यावेळी मिशन लोकशाही या उपक्रमातील चिन्द्रावले केंद्रातील केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवले यांच्या मार्फत वह्या, स्कूल बॅग व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले व कर्दे 2 शाळेतील दिल्ली दौऱ्यासाठी जाणारे विद्यार्थी वेदांत विवेक बारस्कर, श्रेयस सुभाष सनगरे, श्रावणी मंगेश कुळये , नवोदय विद्यालयात व शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेल्या कर्दे 1 शाळेतील कल्याणी विजय गुरव, मंथन परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या अनन्या विजय गुरव आणि मार्गदर्शक शिक्षक यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय व्यवस्थापन समिती कर्दे 2 शाळा, कर्दे गावातील ग्रामस्थ श्री उदय आंबेकर , विवेक बारस्कर , कृष्णा आंबेकर, सुरेश बारस्कर, सौ रमिता पंडये, सौ रुपाली पंडये ,कर्दे 2 शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत दाभोलकर, शिक्षक श्याम पवार, मनोज मुळे, वेदांती कटनाक यांनी खूप मेहनत घेतली. यावेळी कर्दे गावातील ग्रामस्थांची क्रीडांगण व्यवस्था, मंडप स्पीकर व भोजन व्यवस्था यासाठी मोलाची मदत मिळाली,कर्दे गावातील ग्रामस्थांकडून आर्थिक मदत ही मिळाली.चिंद्रवले केंद्रातील विविध शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षकवृंद व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. श्रीमती वनिता वने, श्री संजय गडदे, श्री सुनील गुरव, सौ स्नेहा पाडदळे, श्री सुभाष गुरव, श्री चेतन गुरव, श्रीमती प्रतीक्षा ठोंबरे, श्रीमती ऋतुजा करंबेळे,नंदकुमार गुरव, सौ रश्मिता सल्फे , श्री महेश डिंगणकर , श्री संदेश सोलकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री शशिकांत दाभोलकर यांनी सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मुळे यांनी केले व वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें