पत्रकार नंदकुमार बगाडे यांना “लेखणी सम्राट” महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकार नंदकुमार बगाडे यांना “लेखणी सम्राट” महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज शंभू सेना संघटनेच्या वतीने दिला जाणारा “लेखणी सम्राट” महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती शंभू सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी दिली.

पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जगदाळे मंगल कार्यालय, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडणार आहे, अशी माहिती माने पाटील यांनी दिली.

यावेळी अतुल माने पाटील म्हणाले की, पत्रकार नंदकुमार बगाडे हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून संत, महात्मे व थोर महापुरुषांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवले आहेत. सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडत, विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नंदकुमार बगाडे म्हणाले की, समाजात प्रामाणिकपणे कार्य केल्यास यश निश्चित मिळते. सामाजिक कार्य करताना संघर्ष अटळ असून, संत-महात्मे व थोर महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने मिळालेला “लेखणी सम्राट” पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून, हा सन्मान मी पारगाव सुद्रिक ग्रामस्थांना व ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराजांना समर्पित करतो, असे त्यांनी सांगितले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, पत्रकार नंदकुमार बगाडे यांना यापूर्वी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे समाजभूषण पत्रकार पुरस्कार मिळाला असून, हा त्यांचा दुसरा मोठा सन्मान आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर उदावंत (अहिल्यानगर) यांनी दिली.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें