नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ डिसेंबर रोजी पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ डिसेंबर रोजी पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन

 

नवी मुंबई, दि. २५ डिसेंबर २०२५ :

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) बुधवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पहिले प्रवासी विमान उतरणार असून, या ऐतिहासिक क्षणासह विमानतळाचे अधिकृत संचालन सुरू होणार आहे. नाताळ सणाच्या दिवशी होणारे हे पहिले आगमन महाराष्ट्र व देशाच्या पायाभूत विकासाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सिडकोच्या दूरदृष्टीतून साकार झालेला हा देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ असून, पहिल्याच दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्ससह विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होऊन मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.

कमळाकृती संकल्पनेवर आधारित भव्य टर्मिनलची रचना शाश्वत विकास, भारतीय सांस्कृतिक मूल्ये आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरत आहे. अदानी समूह व नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (NMIAL) यांचे या प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विमानतळ सुरू झाल्यानंतर नवी मुंबई, पनवेल, उरण, कर्जत, पेणसह ठाणे, पुणे, रायगड व कोकणातील नागरिकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ होणार आहे. महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे, मेट्रो व मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) यांमुळे विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे. रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठीही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या दिवशीची उड्डाणे (२५ डिसेंबर २०२५):

पहिले आगमन : इंडिगो 6E-460 (बेंगळुरू) – सकाळी ८.००

पहिले प्रस्थान : इंडिगो 6E-882 (हैदराबाद) – सकाळी ८.४०

सेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्या : इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर, स्टार एअर

दोन दिवसांत नियमित विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सुरू होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची कटिबद्धता दर्शवते. भविष्योन्मुख, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे,” असे सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.


बातमी – मंगेश जाधव नवी मुंबई 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें