पुणे येथे चार दिवस साजरा होणार आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल

rv ad

पुणे येथे चार दिवस साजरा होणार आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल

नवीमुंबई (मंगेश जाधव)

पुणे येथील एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे दि.२ जानेवारी ते दि.५ जानेवारी या कालावधीत दुसरा आंतर राष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ साजरा केला जात असून या प्रसंगी देश विदेशातील सुमारे अडीच हजार कवी-कवयित्री सहभाग घेतील असा विश्वास आयोजक भिडेवाडा कार कवी, संविधान दूत, फुले प्रेमी, जि प. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ध्येयवेडे व्यक्तीमत्व विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

 

फुले फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष असून फुले प्रेमी, संविधान दूत, भिडे वाडा कारशिक्षक कवी विजय वडवेराव यांनी स्वखर्चातून गेल्या वर्षी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान अंतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल चे यशस्वीपणे आयोजन केले होते. या महोत्सवात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून तसेच काही परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिक फुले-प्रेमी कवी -कवयित्री, साहित्यिक, खेळाडू, कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्या प्रसंगी आयोजक विजय वडवेराव यांनी सहभागी कवी व कवयित्रींना आवाहन केले होते की, या वर्षभरात सर्वांनी आपापल्या घरी, वाडी-वस्ती, गाव परिसरात, हाउसिंग सोसायट्यांमध्ये संविधान दूत तसेच फुले प्रेमी या नात्याने समाजातील तळागाळा पर्यंत प्रचार-प्रसाराचे कार्य करीत रहावे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले होते.

त्या प्रमाणे या वर्षी देखील एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे आयोजित चार दिवशीय महोत्सवात गेल्या वर्षभरात संविधान दूत म्हणून विशेष कार्य केले आहे त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी कवी-कवयित्री व रसिकांना भारतीय संविधानाच्या एक हजार प्रती भेट म्हणून देण्यात येणार आहेत. शिवाय या महोत्सवात महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार बाजी याची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या प्रसंगी दि.३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महोत्सवातील २०० कवयित्रींना मोफत साडी वाटप केले जाणार आहे. या चार दिवशीय महोत्सवात सर्व कवयित्री सावित्रीमाईंच्या पेहरावात तर सर्व कवी सफेद कपड्यांमध्ये सहभागी होतील. या वेळी देशातील पहिली शाळा भिडेवाडा, क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, फातिमामाई शेख, मुक्ता साळवे, वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणारी नाट्यछटा, एकपात्री प्रयोग, एकांकिका, पोवाडे, गीत गायन, कविता असा भरगच्च कार्यक्रम चारही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार असून सुमारे दोन ते अडीच हजार लोकं देश-विदेशातून सहभागी होतील असा अंदाज आयोजक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें