गुरुवार दिनांक 25 डिसेंबर ते सोमवार दिनांक 29 डिसेंबर पूजनीय बौद्ध,भिक्षू संघाची गुहागर तालुक्यात पाच दिवस पायी चारिका

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुरुवार दिनांक 25 डिसेंबर ते सोमवार दिनांक 29 डिसेंबर पूजनीय बौद्ध,भिक्षू संघाची गुहागर तालुक्यात पाच दिवस पायी चारिका


आबलोली (संदेश कदम)
गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 ते सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 या पाच दिवसात पूजनीय बौद्ध भिक्षू यामध्ये 1) आसाम येथील भिक्षु खेमपाला, 2) रत्नागिरी(महाराष्ट्र) येथील भिक्षु विमलबोधी, 3) कर्नाटक येथील भिक्षु धम्मतिस्स, 4) महाराष्ट्र, पुणे येथील भिक्षु सचित्त बोधी, 5) महाराष्ट्र,रत्नागिरी येथील भिक्षू संघकीर्ती मुनी,6) बुद्धगया येथील परमानंद,7) महाराष्ट्र पुणे येथील भिक्षू आनंद,8) महाराष्ट्र, पुणे येथील भिक्षू नागसेन आदी. भिक्षू सहभागी होणार असून भिक्षु संघाचा गुहागर तालुक्यात पायी चारिका असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या व संस्कार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध भिक्षू यांच्या चारीकेसाठी गुहागर तालुक्यात ठीक, ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून बौद्धजनतेने या धम्मकार्यात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश (दादा)सावंत, तालुका उपाध्यक्ष आप्पा कदम, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, उपकार्याध्यक्ष अनिल सुर्वे,तालुका सरचिटणीस सुनील गमरे, चिटणीस दिलीप मोहिते, खजिनदार वसंत कदम, धार्मिक संस्कार कमिटी अध्यक्ष शशिकांत जाधव, चिटणीस सुभाष जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
बौद्ध भिक्षूंचा गुहागर तालुक्यातील पाच दिवस तपशीलवार चारिका कार्यक्रम पुढील प्रमाणे गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दापोली येथून सकाळी 08:00 वाजता नाश्ता करून दाभोळ फेरीबोटीने धोपावे येथे सकाळी 10:00 वाजता आगमन दुपारी बौद्धवाडी मध्ये घरोघरी भिक्षूंची भिक्षाचारी का भोजन आणि धम्म देसना होणार आहे. त्यानंतर धोपावे येथून दुपारी 03:30 वाजता चालत रानवी येथे प्रयान होईल रानवी येथे सायंकाळी 05:00 वाजता धम्म देसना होईल आणि रात्रौ वस्ती होईल.
शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रानवी येथून सकाळी 07:00 वाजता नाश्ता करून बौद्ध भिक्षूंचे चालत पवार साखरी येथे सकाळी 10:00 वाजता आगमन होईल त्यानंतर घरोघरी भिक्षूंची भिक्षा चारिका होईल त्यानंतर भोजन आणि धम्म देसना होईल त्यानंतर पवार साखरी येथून दुपारी 03:30 वाजता बौद्ध भिक्षू पवार साखरी येथून चालत सायंकाळी 05:00 वाजता पेवे येथे चालत मार्ग क्रमण करतील. पेवे येथे धम्म देसना होईल. आणि रात्रौ वस्ती होईल.
शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी पेवे येथे बौद्ध भिक्षू सकाळी 07:00 वाजता नाश्ता करून चालत कारूळ येथे बौद्ध भिक्षूंचे आगमन होईल.कारूळ येथे घरोघरी भिक्षूंची भिक्षा चारिका, भोजन आणि धम्म देसना होईल त्यानंतर कारुळ येथून दुपारी 03:30 वाजता बौद्ध भिक्षूंचे तळवली येथे सायंकाळी 05:00 वाजता चालत आगमन होईल. तळवली येथे धम्म देसना होईल. आणि रात्रौ वस्ती होईल.
रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी तळवली येथून सकाळी 07:00 वाजता बौद्ध भिक्षू नाश्ता करून चालत निगुंडळ येथे सकाळी 10:00 वाजता आगमन होईल. निगुंडळ येथे घरोघरी भिक्षा चारीका, भोजन आणि धम्म देसना होईल. निगुंडळ येथून दुपारी 3:30 वाजता बौद्ध भिक्षूंचे चालत पालपणे येथे सायंकाळी 05:00 वाजता आगमन होईल. पालपेणे येथे धम्म देसना आणि रात्री वस्ती होईल.
सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 07:00 वाजता बौद्ध भिक्षू पालपेणे येथून नाश्ता करून चालत सकाळी 10:00 वाजता जानवळे सभागृह येथे आगमन होईल. जानवळे परिसर येथे घरो घरी बौद्ध भिक्षूंची भिक्षा चारिका, भोजन आणि धम्म देसना होईल. त्यानंतर सायंकाळी 05:00 वाजता जानवळे सभागृह येथून चिखली येथे बौद्ध भिक्षूंचे चालत आगमन होईल. चिखली येथे धम्म देसना आणि रात्रौ वस्ती होईल.


RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात