पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची खलबतं; अजित पवारांचा ‘एकाच चिन्हावर’ निवडणुकीचा प्रस्ताव, शरद पवार काय निर्णय घेणार?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची खलबतं; अजित पवारांचा ‘एकाच चिन्हावर’ निवडणुकीचा प्रस्ताव, शरद पवार काय निर्णय घेणार?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उशिरापर्यंत बैठका; रोहित पवार, अमोल कोल्हे यांची अजित पवारांशी चर्चा, युतीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता

पुणे ~बातमी :
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नव्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

काल रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटातील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रत्यक्ष भेट घेतली. या बैठकीत प्रामुख्याने पुणे महापालिकेतील जागावाटप आणि निवडणूक रणनितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीतील ‘इनसाईड स्टोरी’नुसार, अजित पवार यांनी शरद पवार गटाला मोठा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी आणि तीही एकाच निवडणूक चिन्हावर लढवावी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याचे सांगितले जाते. जागावाटपाबाबत कोणताही वाद नसून, मुख्य मुद्दा हा निवडणूक चिन्हाचा असल्याचेही समोर आले आहे.

हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार असून, आज रात्री किंवा उद्या युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ‘घड्याळ’ हे चिन्ह शरद पवार गटाला मान्य होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. “आज संध्याकाळपर्यंत निरोप द्या,” असा संदेश अजित पवार यांनी बैठकीला उपस्थित नेत्यांमार्फत पाठवल्याची माहिती आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आज आम्ही चौघांनी अजित पवार यांची भेट घेतली. आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. चर्चा झाली असली तरी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. काही प्रस्तावांवर चर्चा झाली आहे. आमच्यामध्ये आणखी बैठक होईल. सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय कळवला जाईल. महाविकास आघाडीसोबतही आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीचे स्वरूप बदलले आहे.”

एकंदरीत, पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, आणि अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात