साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या रिक्त चेअरमन पदासाठी लवकरच निवडणूक

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या रिक्त चेअरमन पदासाठी लवकरच निवडणूक

अध्यासी अधिकारी म्हणून संतोषकुमार पाटील यांची नियुक्ती; सात दिवसांत अजेंडा फिरवल्यानंतर निवडणूक प्रक्रिया

बातमी : राजापुर~लांजा 
लांजा तालुक्यातील साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, साटवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब (१२) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ७७ अन्वये याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून श्री. संतोषकुमार पाटील, सहकारी अधिकारी श्रेणी–१, सहकारी संस्था लांजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी दिले आहेत.

साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन श्री. शांताराम तरळ यांनी वैयक्तिक कारणास्तव दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा संचालक मंडळाच्या दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक ३ अन्वये मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव तालुका सहकारी निवडणूक अधिकारी, लांजा यांच्यामार्फत जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता.

सध्या संस्थेचे चेअरमन पद रिक्त असून माननीय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अध्यासी अधिकारी नियुक्तीचे अधिकार जिल्हा व तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

सात दिवसांत अजेंडा फिरवून त्यानंतर चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


लांजा प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]