■ पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते समिर शिरवडकर यांची पत्नी समीक्षा शिरवडकर पंचायत समिती अणुसरे गणातून इच्छुक
■ उमेदवारी मागणी अर्ज पक्षश्रेष्ठींना केला सादर
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर:- ( अणसुरे) :–तालुक्यातील कातळी जिल्हापरिषद गटातील अणसुरे पंचायत समिती गणातून समाज कार्याची जाण असणाऱ्या,शिक्षित, आणि राजकिय वारसा असलेल्या होळी गावातील समीक्षा समिर शिरवडकर यांनी दि.२९ डिसें.२५ रोजी शिवसेना ( शिंदे गट) राजापूर मधील कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यां सहित इच्छुक ( उमेदवारी मागणी अर्ज) तालूका प्रमुख दिपक नागले यांच्याकडे सुपूर्द केला.
पंचायत समिती गण -अणसुरे इच्छुक ( उमेदवारी मागणी) अर्ज शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांच्याकडे सादर करताना, उपस्थित अनुक्रमे ,महिला तालुकाप्रमुख रेखा कोंडेकर, मा.विभागप्रमुख नंदकुमार मिरगुले, इच्छुक उमेदवार सौ. समीक्षा समिर शिरवडकर ,,जैतापुर सरपंच राजेंद्रप्रसाद राऊत, जुवे-जैतापुर सरपंच सौ.आराध्या सरपोळे, समिर शिरवडकर, म.विभागप्रमुख जान्हवी गावकर, विभागप्रमुख मनोज अडविरकर, पुरुषोत्तम खांबल, उपविभागप्रमुख राजन कोंडेकर, श्रीकृष्ण राऊत, संदीप चव्हाण, प्रभाकर खानविलकर, प्रसाद मांजरेकर, सिने कलाकार सुनील करगुटकर, शाखाप्रमुख शशांक शिरवडकर, म. शाखाप्रमुख साक्षी शिरवडकर , शाखाप्रमुख रेखा कुवेस्कर,शौनक पावसकर, दिग्विजय पेडणेकर, गणेश बाणे,निवास शिरगावकर,अमोल सोगम,जितेंद्र गावकर,सुनिल होळकर.














