■ माहिती अधिकार महासंघ राजापूर कार्यकरणी ची सभा संपन्न
राजापूर:- महाराष्ट्र भर पसरलेल्या संस्थापक,अध्यक्ष सन्मा.सुभाष बसवेकर यांच्या माहीती अधिकार कार्यकर्ता फडरेशन महाराष्ट्र राज्य च्या राजापूर तालूका कार्यकारणीची सभा ३१ डिसेंबर २०२५ रोजी तालुक्यातील आडिवरे येथे उत्साहात संपन्न झाली.माहीती अधिकार महासंघचे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
यावेळी, महाराष्ट्र राज्य सचिव समिर शिरवडकर,तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अद्वैत अभ्यनकर यांनी विचार मांडले. संघटना वाढीसाठी तालुकाभर कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात यावे असा ठराव झाला,येत्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर बाबत चर्चा करण्यात आली.आणि अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी सचिव पुरुषोत्तम खांबल यांनी उपस्थितांचे स्वागत करून, उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.















