गुहागर येथील सरस महोत्सवात ग्रामीण भागातील, लाल मातीतील जाखडी गायकांनी आणि कलाकारांनी उडवली धमाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर येथील सरस महोत्सवात ग्रामीण भागातील, लाल मातीतील जाखडी गायकांनी आणि कलाकारांनी उडवली धमाल

साक्षात छ. शिवाजी महाराजांचे घडविले दर्शन

आबलोली (संदेश कदम)

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर येथे आयोजित करण्यात आलेल्या सरस महोत्सवाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या सरस महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात पंचायत समिती गुहागर आणि उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून बचत गटांचे 37 स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध होते आणि रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाले. यावेळी डोंबिवली येथे आगरी महोत्सवात गाजलेला गुहागर तालुक्यातील श्री.संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या ग्रामीण भागातील लाल मातीतील गायक आणि कलाकारांचा जाखाडी नृत्याचा जबरदस्त कार्यक्रम संपन्न झाला. या जाखडी नृत्यांनी जबरदस्त धम्माल उडवून दिली.सरस महोत्सवाच्या या आठवनींचा घेतलेला मागोवा..!

पंचायत समिती गुहागरचे बीडीओ शेखर भिलारे, उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक दुर्वा ओक, राहिला बोट,यांनी आणि गुहागर वाशी यांनी याच व्यासपीठावर कार्यक्रम करण्यासाठी संधी दिली

श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत, जांभुर्णेवाडी या मंडळाचे जाखडी नृत्याचे शाहीर अशोक कुंभार यांनी शाहिर मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो – वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्वीघ्नम,कुरूमदेवं,सर्व कार्यसू.. सर्वदा, सर्व मंगल, मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण अंबीके गौरी नारायणे नमस्तुते…sss

रात्र अशी अंधारी,आंम्ही आलो गुहागरच्या समुद्र तीरी – गणेशा रंगनीये सत्वरी गुण गातो तुझे या समुद्र तीरी,

सर्व देवांचा राजा आपला लाडका गणरायाच्या चरणाशी आपण सर्वांनी लिन होऊया असे आवाहन करीत शाहीर अशोक कुंभार यांनी गणरायाला मानाची मानवंदना करून “जय गणराया वंदितो पाया ” या गाण्याने जबरदस्त सुरुवात केली.. आज तुझे आम्ही गोड नाम घेतो पडतो तुझ्या पाया, “जय गणराया वंदितो पाया” गणरायाची प्रार्थना करून गणरायाच्या नामाचे आणि गुणांचे वर्णन झाले. गणरायाच्या नामाचे आणि गुणांचे, रूपाचे वर्णन करणारा गण सादर केला.

अनंत नामाने नटलेला असा आमचा गणराज आहे. अनंत कामे करणारा असा आमचा गणराज आहे. सुखकर्ता, दु:खहर्ता हे फक्त आपल्या गणरायांनाच म्हणतात,म्हणूनच गणरायाचे गोड नाम आमच्या हृदयात आहे. लाडक्या गणरायाला मानाची मानवंदना, मानवंदना गौरी गणेशाला,शुभ कार्याला नमो गणेशाला.. गणा धावना.. गणा.. धावना.. धावना.. अंगणा शाहीर अशोक कुंभार यांच्या गाण्याने धमाल उडून गेली

प्रार्थना झाली, गण झाला आणि शक्ती तुऱ्यांच्या नियमाप्रमाणे सह. शाहीर महेश जामसूतकर यांनी ” यमुना तीरी, वाजवी बासरी”.. ” आला आला नंदाचा श्रीहरी.. ” ही गवळण सादर केली आणि धमाल उडवली…

त्यानंतर शाहीर अशोक कुंभार यांनी सरस महोत्सवावर “गुहागर तालुका आहे सुंदर गाव पहा नकाशात शोभते नाव, एक मनाचा, प्रेम पणाचा आहे म्हणे प्रेम भाव, तालुक्यातील स्वयंसहायता बचत गटांचा हा सोहळा साजरा होतोय.. या कार्यक्रमाला जमा झालो याच वेळेला “..” आमच्या कोकणचा मेवा हवसेने खावा, आपला घरी घेऊन तुम्ही जावा.. जीवनभर सुख शांती लाभो.. करू विनंती परमेश्वरा.. सरस महोत्सव या कार्यक्रमाला जमा झालो या वेळेला” या गाण्याने धमाल उडून दिली.

त्यानंतर महाराष्ट्राच्या दऱ्या, खोऱ्यातून गाजविली तलवार… कोकणच्या भूमीमध्ये जो आज भगवा फडकतोय.. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळेच फडकतोय.. ” फडकला भगवा झेंडा साऱ्या महाराष्ट्राची शान..” ” प्रणाम माझा शिवबाला. ” हे गाणे सह.गायक महेश जामसुतकर यांनी गाऊन धमाल उडवली.. हे गाणे चालू असतानाच प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनही घडविले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.

या जाखडी नृत्यात श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या मंडळाचे शाहीर अशोक कुंभार, सह.शाहीर सुधीर जामसूतकर, सह.शाहीर महेश जामसुतकर यांचेसह जाखडी नृत्य कलाकार पार्थ जामसुतकर, आदित्य जामसुतकर, गीतेश शिरकर, ओंकार जामसुतकर, अजित जामसुतकर,अंकुश कुंभार, दिलीप शिरकर आणि सुधीर जामसुतकर, ढोलकी वादक – शुभम जामसूतकर, विनेश शिरकर, झांज वादक – एकनाथ जामसुतकर, कोरस – दत्ताराम कोळथरकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोहम जामसुतकर यांनी उत्कृष्टपणे सांभाळली मावळ्यांच्या भूमिकेत शंकर कोळथरकार, श्रीरंग जामसुतकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली साऊंड आणि लायटींग अनिल कुंभार तसेच फोटोग्राफर सुरज कोळथरकर आणि या संपूर्ण जाखडी नृत्य कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन सुनील गुडेकर सर यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला