अखेर त्या एसटी कंडक्टर ची मुजोरी नरमली

अखेर त्या एसटी कंडक्टर ची मुजोरी नरमली

पडवे (गुहागर)

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमध्येच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पडवे येथे समोर आला होता. गुहागर–तवसाळ–पडवे मार्गावर धावणाऱ्या एका एसटी वाहकाच्या मुजोरीमुळे शालेय विद्यार्थी, नोकरीस जाणाऱ्या महिला-मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

संबंधित वाहका कडून प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे, ओरडणे, वाटेल ते बोल काढणे असे प्रकार सातत्याने घडत होते. विशेषतः महिला व मुलींशी सौजन्य न दाखवता, ही एसटी जणू स्वतःच्या वैयक्तिक मालकीची असल्याप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात होती.

तवसाळ ते पडवे मार्गावरून प्रवास करणाऱ्या शालेय मुला-मुलींना व महिलांना अनेकदा मुख्य स्टॉप पासून मध्येच उतरवले जात असल्याने त्यांना सुमारे एक किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत होते, यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता.

वरिष्ठ यांचेशी तक्रार करूनही त्यांचे वागणुकीत बदल होत नव्हता,अखेर पडवे येथील जागरूक नागरिक व प्रवाशांनी एकत्र येत संबंधित चालका वाहक यांना  जाब विचारला. त्याच्या वर्तना बद्दल विचारले असता,यावेळी वाहकाने  आपली चूक मान्य करत पुढे अशा प्रकारचे वर्तन न करण्याचे आश्वासन दिले. शेवटी अशा उर्मट वाहकाला आता तरी समज येईल आणि वागणूक सुधारेल अशी चर्चा ही रंगू लागली आहे.

या घटनेनंतर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून,  एसटी प्रशासनाने अशा प्रकारांवर वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.जेणे करून महिला प्रवाशांना प्रवास करताना अ सुरीक्षितिता वाटणार नाही.

भविष्यात विद्यार्थी, महिला, वृद्ध प्रवासी यांना नाहक त्रास दिला तर एसटी प्रशासन कडून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदर च्या घटनेची माहिती परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि पोलीस निरीक्षक गुहागर यांना लेखी तक्रार देण्यात येणार असल्याचे समजते.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें