भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर यांचा वाढदिवस अन्नदानाने साजरा

भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप मगर यांचा वाढदिवस अन्नदानाने साजरा

 

अहिल्यानगर :

श्रीरामपूर तालुक्यातील भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरात अन्नदान करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

 

या प्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील, पोपटराव बागुल (रामनगर), भीमशक्ती संघटनेचे श्रीरामपूर शहर अध्यक्ष अंबादास निकाळजे, नवनिर्वाचित नगरसेवक लकी शेठ, ‘आवाज जनतेचा’च्या संपादिका जयश्रीताई बोरसे, विशाल तोरणे (अहिल्यानगर जिल्हा महासचिव, भीमशक्ती संघटना), सामाजिक कार्यकर्ते सुनील संसारे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन संदीप मगर यांचा सन्मान केला.

 

यावेळी नंदकुमार बगाडे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संदीप मगर यांनी भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांना वाचा फोडली आहे. विविध शासकीय योजनांचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवणे, जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि आंदोलन, उपोषण व चर्चेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीरामपूर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ते आजही सक्रियपणे कार्यरत आहेत.

 

संदीप मगर यांचा वाढदिवस श्रीरामपूर तालुका व शहरात उत्साहात साजरा करण्यात आला असून, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युवकांनी थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणून वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमांतून साजरे करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

— नंदकुमार बगाडे पाटील, अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें