संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध

अंजनवेल जिल्हा परिषद गटाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार

गुहागर तालुक्यातील अंजनवेल विधानसभा मतदारसंघात असगोली जिल्हा परिषद गटातून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपा ओबीसी जिल्हा सेल चे अध्यक्ष आणि नुकतेच शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरसीची केली. अशातच आज निवडणूक अर्जांच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी विक्रांत जाधव यांनी जैतापकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवून त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. त्यामुळे शिवसेना गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
संध्याकाळी ४ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या हरकत अर्जाची कायदेशीर सुनावणी घेण्यात आली.
विक्रांत जाधव यांनी त्यांची बाजू व हरकतीचे मुद्दे मांडताना जैतापकर यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात खाडाखोड केली आहे आणि संपत्ती च्या वर्णनामध्ये विगतवारी केलेली नाही तसेच त्यांच्यावर असलेल्या प्रलंबित केस संदर्भात खरी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही असे मुद्दे मांडले.
संतोष जैतापकर यांच्या वतीने सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. संकेत साळवी यांनी लेखी म्हणणे सादर करून युक्तिवाद केला. ॲड. संकेत साळवी यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्त्वाचे निर्णय सादर करून तांत्रिक मुद्द्यावर उमेदवाराचा अर्ज नाकारता येणार नाही , तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या फॉरमॅट मध्येच जैतापकर यांनी माहिती नमूद केली आहे तसेच प्रलंबित केस च्या संदर्भात कोणतीही माहिती लपवलेली नसून त्यांच्या विरुद्ध दाखल असलेली केस ही नाममात्र स्वरुपाची आहे असे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संध्याकाळी उशिरा निकाल जाहीर करत संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.
या केसच्या सुनावणी दरम्यान ॲड. संकेत साळवी याना ॲड.अलंकार विखारे, ॲड.सुप्रिया वाघधरे, ॲड.सुशील अवेरे, ॲड.मानसी सोमण, ॲड.रोशनी पवार यांनी सहकार्य केले.
या निकालामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण असून या जिल्हा परिषद गटाची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार