पाटपन्हाळे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी

 

पाटपन्हाळे महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी

देशप्रेम व कर्तृत्वाचा वारसा जपण्याचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांचे आवाहन

आबलोली (संदेश कदम) :
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यु.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यकर्तृत्वाचा व विचारांचा सखोल आढावा घेतला.

“तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूंगा” या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी ब्रीदवाक्याची आठवण करून देताना, आजच्या तरुण पिढीने देशावर निष्ठेने प्रेम करून राष्ट्रासाठी काहीतरी ठोस कार्य केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्भीड नेतृत्वातून समाजाला दिशा देण्याची प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. असे केल्यासच या महान नेत्यांना खरे अभिवादन होईल, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपस्थित सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. चैत्राली झिंबर, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें