या गटात आधीही मी नेतृत्व केलं आणि यापुढेही मीच नेतृत्व करणार” – महेश नाटेकर

“या गटात आधीही मी नेतृत्व केलं आणि यापुढेही मीच नेतृत्व करणार” – महेश नाटेकर

 

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटात यावेळी शिवसेनेचे दोन गट आमनेसामने येणार असून ही लढत ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे जि.प. पडवे गटातील उमेदवार महेश नाटेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.

महेश नाटेकर म्हणाले, “आम्ही आधीही धनुष्यबाण घेऊन होतो आणि आजही धनुष्यबाण घेऊनच आहोत. निवडणूक रिंगणात समोर कोण आहे याची चिंता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधीही केलेली नाही. आव्हान कोणाला द्यायचं असतं हे मला चांगलं माहिती आहे. माझ्यासमोर कुणाचंही आव्हान नाही. या गटात आधीही मी नेतृत्व केलं आहे आणि यापुढेही मीच नेतृत्व करणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “प्रतिस्पर्धी जेव्हा शिवसेनेचे तालुकाप्रमुख होते, तेव्हा त्यांनी किती गावांमध्ये बैठका घेतल्या, किती लोकांशी संवाद साधला, किती विकासकामे केली हे त्यांनी जनतेसमोर मांडावे.”

महेश नाटेकर यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून या भागात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली असून अनेक रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. येत्या काळात मोठ्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.

या भागात किमान एक तरी पाण्याचे धरण उभे राहावे आणि त्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, हा आपला दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेती, मत्स्य प्रक्रिया किंवा कारखानदारीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें