करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया महाविद्यालयाने आयोजित ‘कॉस्मॉस जल्लोष’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रसिद्ध सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करमणूक क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. “करमणूक क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवायचे असेल, तर केवळ प्रतिभा नव्हे, तर अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत पुढे जोडले, “संकटांमध्येही धीर धरा, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला मजबूत बनवतो.”

स्वामी समर्थांच्या भूमिकेमुळे सर्वत्र नावलौकिक मिळवलेले अशोक कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून सांगता समारंभाला उपस्थित होते. त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. ‘गजनी’ चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थित विद्यार्थी त्यांच्या कथांमध्ये गुंतून बसले आणि अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेले प्रश्न उत्तरं घेतली.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २७ व २८ जानेवारी या दोन दिवसांत ‘कॉस्मॉस जल्लोष’ अंतर्गत सादरीकरण कला, सर्जनशील कला, साहित्यिक कला, क्रीडा प्रकार तसेच इतर कलात्मक व सर्जनशील क्षेत्रांतील एकूण २१ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मुंबई परिसरातील ५० हून अधिक महाविद्यालयांमधून २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी रंगभूमीवर उत्साहाने सादरीकरण करताना पाहिले गेले.

कॉस्मोपॉलिटन संस्थेचे अध्यक्ष श्री. भारत वालिया तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर हे मान्यवर सांगता सोहळ्याला उपस्थित होते. महोत्सव यशस्वी व संस्मरणीय ठरावा यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. बागेश्री बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यापक व विद्यार्थ्यांच्या संघाने मोठ्या समन्वयाने काम केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि कौशल्याने कार्यक्रमात जीवंतपणा आला.

‘कॉस्मॉस जल्लोष’च्या समन्वयक शावी श्रीवास्तव तसेच सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा महोत्सव सर्व संबंधितांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणातून करमणूक क्षेत्रातील नवसर्जनशीलतेला उत्तम मंच उपलब्ध झाला. उपस्थित प्रेक्षकांनी रंगभूमीवरच्या ऊर्जा आणि प्रतिभेचे कौतुक केले, तर विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा