हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती; शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव, हळदीकुंकू व विविध खेळांनी रंगला सोहळा

मुंबई – गोरेगाव, प्रतिनिधी :

गुहागर तालुक्यातील हेदवी गावच्या जुवेवाडी येथील तरुण विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे उत्साहात करण्यात आले. विविध कारणांनी मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी वास्तव्य असलेल्या ग्रामस्थांनी वर्षातून एकदा तरी एकत्र यावे, गावाशी नाळ जोडून ठेवावी आणि नवतरुण पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून द्यावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या स्नेहसंमेलनाला ग्रामस्थ व महिला मंडळींची लक्षणीय उपस्थिती लाभली. गावाकडील पारंपरिक रुढी-परंपरा जपण्याचा आणि सामाजिक एकोपा वाढवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. सन २०१२ पासून सलग १५ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही तो तेवढ्याच उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात सर्व मुलांचा सत्कार करून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच जुवेवाडीच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थ व महिला मंडळ पदाधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष सुवारे, उपाध्यक्ष श्री. विठोबा घाणेकर, सचिव श्री. शशिकांत जाधव, उपसचिव श्री. वैभव निकम, खजिनदार श्री. रघुनाथ जाधव, उपखजिनदार श्री. कपिल मांडवकर व श्री. प्रफुल निकम तसेच सल्लागार श्री. मिलिंद पाटेकर, श्री. विवेक कातकर, श्री. अशोक पाटेकर, श्री. संतोष घडशी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. मिलन आग्रे, उपाध्यक्ष सौ. प्रणाली पानगले, सचिव सौ. प्राप्ती घडशी, उपसचिव सौ. सानवी आग्रे, खजिनदार सौ. वनिता जाधव, उपखजिनदार सौ. संचिता सुवारे तसेच सल्लागार सौ. मधुरा पाटेकर, सौ. रोहिणी पानगले, सौ. शिल्पा संतोष घडशी, सौ. नंदिनी इतापे, सौ. नलिनी निकम आणि सौ. वैशाली निकम यांनीही मोलाचे योगदान दिले.

सकाळपासूनच उपस्थितांसाठी चहा-नाश्ता व दुपारच्या स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी महिला मंडळाचा विशेष व अधिक सहभाग लक्षवेधी ठरला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने करण्यात आली.

एकंदरीत, हेदवी जुवेवाडी स्नेहसंमेलनाने सामाजिक ऐक्य, परंपरांचे जतन आणि गावाशी असलेली भावनिक नाळ अधिक दृढ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam