सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

highlight

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना शाल, पुष्पगुच्छ व पेढे देऊन शुभेच्छांचा वर्षाव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार महेश नाटेकर तसेच पडवे पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार निलेश सुर्वे आणि पाचेरी सडा पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सुचिता घाणेकर यांचे आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी तिन्ही नवनिर्वाचित उमेदवारांना शाल परिधान करून, पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरवून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयानिमित्त आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी उमेदवारांसोबत सागर काजरोळकर, विजय वैद्य, राजू कारेकर, प्रदीप सुर्वे, विशाल गोताड, शरद पावरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित सदस्यांनी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करून विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने आयोजित या स्वागत सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें