श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*श्रीरामपूर शहरवासीयांची*

*गत झाली केवीलवाणी!*

 

*प्यावे लागत आहे चक्क*

*दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*

 

—————————————–

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

नगर पालिकेच्या गलथान कारभाराविरुद्ध समाजवादी पार्टी आमरण उपोषणाच्या पावित्र्यात – जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

नंदकुमार बागडेपाटील 

श्रीरामपूर नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळाद्वारे येत असलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष जोएफ युनूस जमादार आणी समस्त त्रस्त नागरीकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष श्रीरामपूर नगर पालिका यांना एका निवेदनाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणेबाबत मागणी केली आहे, तसेच तात्काळ यावर उचित पावले उचलली नाही गेल्यास दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ पासून नगर पालिका कार्यालयासमोर समस्त त्रस्त नागरीकांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, श्रीरामपूर नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याचे पाण्याच्या नळांद्वारे शहरातील पंजाबी, कॉलनी, सिंधी कॉलनी,काझीबाबा रोड परिसर,नेहरुनगर परिसर,आदर्श हौसिंग सोसायटी आदी भागातील नागरीकांना गटारीचे घाण पाणी मिश्रीत दुषीत पाण्याचा पाणी पुरवठा होतो आहे.पाण्याचा रंगही पिळसर आहे शिवाय पाण्यात भयंकर दुर्गंधी (वास) येत आहे.हे पाणी पिल्यामुळे शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही, करीता श्रीरामपूर

विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.हेमंत (तात्या) ओगले, नगराध्यक्ष मा. करणदादा ससाणे आणी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातिने लक्ष घालून त्वरित नागरीकांच्या या ज्वलंत समस्येंसंबधी तात्काळ कठोर पावले उचलावीत आणी शहरातील समस्त त्रस्त नागरीकांना उचित न्यात देत तात्काळ पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष घालावे अशी समाजवादी पार्टी आणी समस्त त्रस्त नागरीकांद्वारे मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे गटारीचे दुर्गंधीयुक्त दुषीत घाण पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या आजवर नगर पालिका प्रशासनाकडे अनेकवेळा अनेक तक्रारी करुनही संबंधित नगर पालिका प्रशासनाने आजवर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने शहरातील त्रस्त नागरीकांसह समाजवादी पार्टी श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहे.करीता वेळीच या ज्वलंत नागरी समस्यांचा योग्य बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा आहे,

यासोबतच संबंधित नगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे काही कामचुकार अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष साईडवर न जाता नगर पालिकेत बसुन नेहमीच पाणी स्वच्छ असल्याचे प्रशासनास खोटे – नाटे रिपोर्ट सादर करुन नगर पालिका प्रशासनासह शासनाची देखील दिशाभूल करण्यात मोठे पटाईत असल्याने आपण स्वतः सदरील भागात नळांद्वारे येणाऱ्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्याची स्वतः सहनिशा करावी आणी खोटे नाटे रिपोर्ट सादर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करावी अशीही आमची मागणी आहे.करीता आमच्या या रास्त मागणीचा सखोल विचार होऊन तात्काळ यावर उचित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा समस्त त्रस्त नागरीकांसह समाजवादी पार्टी सोमवार सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारेल व यापासून उद्भवलेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिका प्रशासनावर राहील कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.असेही शेवटी नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे जोएफ जमादार, लहुजी सेनेचे हनीफ पठाण, विनोद जगताप, ओम त्रिभुवन, बाळासाहेब बागुल, अजय चिनोरीया, जैबुन्निसा जहागीरदार, चंद्रकला चव्हाण, पल्लवी जगताप, फरीदा शेख, शमीम पटेल, सुल्ताना शेख, शहनाज तांबोळी, मुश्तरी शेख प्रिया जनवेजा, सलमान शाह, रोहन परदेशी, तन्वीर शाह, परवेज शेख, दानिश शाह आदि उपस्थित होते.

 

या निवेदनावर समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष जोएफ युनूस जमादार यांचेसह शहरातील समस्त त्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणी या निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर,

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.आबु असिम आझमी, श्रीरामपूर चे आमदार हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे, श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार राजेंद्र वाघ, पोलीस निरीक्षक (शहर) नितीन देशमुख आदिंना पाठवण्यात आल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम)  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई...
Read More
गोरेगाव पश्चिम येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत महेश नाटेकर, निलेश सुर्वे व सुचिता घाणेकर यांना...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीतर्फे पडवे जि.प. व पं.स. नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे ग्रामस्थांची...
Read More
हेदवी जुवेवाडी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाचे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

‘निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रत्नागिरी - सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, आणि वनराई, पुणे व...
Read More
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न

लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “लाठी–काठी स्पर्धांच्या माध्यमातून सेवा सहयोगचा...
Read More
लाठी–काठी स्पर्धांतून किशोरींमध्ये आत्मविश्वास; ठाण्यात भव्य अंतिम फेरी उत्साहात संपन्न
Play sound