यूजीसी समर्थनार्थ पालघर | निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यूजीसी समर्थनार्थ पालघर | निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन 

नवीमुंबई (मंगेश जाधव)

उच्च शिक्षण क्षेत्रात समानता, सामाजिक न्याय आणि भेदभावमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने यूजीसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०२६ च्या समर्थनार्थ आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी संस्कृतीक चळवळ यांच्या वतीने पालघर जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुभाष भागडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व आदी आधारांवर होणारा भेदभाव रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असून, यामुळे शैक्षणिक वातावरण अधिक समताधिष्ठित, सुरक्षित व न्याय्य बनेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भेदभावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, यापूर्वी भेदभावविरोधी नियम अस्तित्वात असतानाही काही दुर्दैवी घटनांनी देश हादरून गेला आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी यूजीसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०२६ ची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. हा कायदा कोणत्याही सर्वसामान्य किंवा कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्याला लक्ष्य करण्यासाठी नसून, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी, सन्मान व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तसेच या कायद्यामधील तरतुदींवर तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चर्चा करून आवश्यक सुधारणा कराव्यात आणि उच्च शिक्षण संस्थांमधील भेदभाव पूर्णतः थांबवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रतिनिधी ॲड. आदिती विनायक पवार, राजेंद्र म्हस्के, डॉ. रोहन सोनावले, सुकलाल पाटील उपस्थित होते.

या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाने यूजीसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट २०२६ तातडीने आणि प्रभावीपणे अंमलात आणून, उच्च शिक्षण क्षेत्रात समताधिष्ठित, सुरक्षित व भेदभावमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता पक्षाच्या वर्धापनदिनी नेतृत्व हस्तांतरणाचे संकेत; संजय राऊत यांचाही...
Read More
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता

पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव देहदान व अवयव दान" या...
Read More
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत

बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत 🔹 भाजपच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार; राजभवनात पार पडला...
Read More
बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित...
Read More
पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावरील धोकादायक वळणावर समोरासमोर धडक; चालकाला केबिनमधून...
Read More
संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २१व्या...
Read More
किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी! *रुग्णांना मोठा दिलासा: आता अर्ज भरण्याची कटकट...
Read More
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी!

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या...
Read More
भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश...
Read More
आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश