गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; सभापती–उपसभापती पदांवर राजकीय हालचालींना वेग

rv ad

📰 : गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; सभापती–उपसभापती पदांवर राजकीय हालचालींना वेग

🔹 ⭕ सभापती पद शिवसेने कडे जाण्याची शक्यता; उपसभापती पदावर भाजपकडून निलेश सुर्वे, मंगेश जोशी यांच्या नावांची चर्चा

गुहागर – सुजित सुर्वे, पडवे

तालुक्यातील पंचायत समिती गुहागरवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने आता सभापती व उपसभापती पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सभापती पद हे शिवसेनेकडे जाणार, असे जवळपास निश्चित मानले जात असताना उपसभापती पद भाजपकडे जाणार का, याबाबत जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, जर उपसभापती पद भाजपकडे गेले, तर गुहागर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस मंगेश जोशी ही दोन नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. दोन्ही नेत्यांचा संघटनात्मक अनुभव आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता लक्षात घेता, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निलेश सुर्वे हें भाजप कडून पडवे पंचायत समिती मधून तर मंगेश जोशी हें तळवली गण पंचायत समिती मधून निवडून आले आहे त.

दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखून पदांची वाटणी कशी होणार, याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्टता येण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणेकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें