गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम पेटवण्यात आले

गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम पेटवण्यात आले

आबलोली (संदेश कदम)

मार्च महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते होळीचे.कोकणात आज सकाळपासून अनेक ठिकाणी होळी साजरी झाली.या होळीला कोकणात तेरसेचे होम अस म्हटल जात.आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी तेरसेचे होम पेटवण्यात आले.ईथे पहाटेपासूनच होळीला सुरुवात होते आणि नव्याने लग्न झालेले तरुण त्या होमाला 5 फेऱ्या मारून त्यात नारळ वाहतात.तसेच कोकणातील पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते.यावेळी गावच्या देवीच्या नावाने आरोळी देखील दिली जाते त्याला फाका देणे असे म्हणतात.कोकणात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो कामानिमित्त बाहेरगावी असणारे सर्व चाकरमानी आपली सगळी कामं बाजूला सारून न चुकता होळीसाठी आपल्या गावाला येतात. फोटोत आपण ही दृश्य पाहतोय ही गुहागर तालुक्यातील मुंढर गावातील असून या दृष्यांमध्ये सगळे गावकरी व चाकरमानी जे आहेत ते मनमुराद होळीचा आनंद लुटताना पाहायला मिळतात होळी साजरी करताना पाहायला मिळतात.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें