ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

अहिल्या नगर – नंदकुमार बागडेपाटील 

प्रवरानगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी *सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत* उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. जिद्द, कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवत सैनिक स्कूल साठी पात्रता मिळवली आहे. यंदाच्या ऑल इंडिया सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत शाळेतील *आदर्श उनवणे, मनिष कानडे, अनुराग डोंगरे, पवन गोरे, अथर्व गोल्हार व आदित्य वाघमारे हे सहा विद्यार्थी* सैनिक स्कूल साठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील मर्यादित साधन सामग्री असूनही विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या जिद्दीचा व गुणवत्तेचा प्रत्यय दिला आहे, त्यांच्या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना *मुख्याध्यापक श्री नामदेव फटांगरे तसेच श्रीम. मनिषा गावडे, श्रीम. मनिषा सपकाळे व श्री. महादेव कानडे* या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विशेषतः परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिक्षकांनी 15 मे पासून वर्षभर सुट्टी न घेता सातत्याने *भरपूर सराव चाचण्या, अतिरिक्त वर्ग घेऊन, QR कोड – गुणवत्ता उपक्रम राबवून आणि वैयक्तिक मार्गदर्शन करून* विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.

शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे जि. प. मार्फत राबविला जाणाऱ्या *’मिशन आरंभ’* या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या नियमित सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल *मान. जलसंपदा मंत्री नामदार डॉ. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील तसेच मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील* यांनी अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.

या यशामध्ये राहाता तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे यांचे प्रेरणादायी प्रोत्साहन, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख श्री. कानिफनाथ कोळेकर* यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेत सध्या आनंदाचे वातावरण असून *हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी* ठरत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

येथे दिलेल्या माहितीवर आधारित एक सविस्तर आणि 'SEO' (Search Engine Optimization) पूरक बातमी खालीलप्रमाणे आहे: मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८...
Read More
मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन मुंबई (गुरुदत्त...
Read More
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव नवीमुंबई (मंगेश जाधव) पुणे येथील ऐतिहासिक वास्तू लाल महल येथे छत्रपती...
Read More
शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक ​आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक...
Read More
विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश.  गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख संदीप...
Read More
आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी अहिल्या नगर - नंदकुमार बागडेपाटील  प्रवरानगर येथील जिल्हा परिषद...
Read More
ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

देशाच्या राजकीय वर्तुळातून राज्यपालांच्या नियुक्त्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (५...
Read More
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold-Silver Rate Today: युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव मुंबई/पुणे: पश्चिम आखाती देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळे...
Read More
युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक...
Read More
भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम