आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख संदीप निमुणकर यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पडवे जिल्हा परिषद गटाच्या वतीने तिथी प्रमाणे शिव जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, दीप प्रज्वलन करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..! विजय असो..!, जय भवानी, जय शिवाजी..! अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत, तालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, तालुका महिला आघाडीच्या वनिताताई डिंगणकर, माजी सभापती सौ. पूर्वीताई निमुणकर, तालुका सचिव विलास गुरव, नरेश निमुणकर, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शाखाप्रमुख प्रथमेश निमुणकर, तृषांत सुर्वे, रत्नाकर सोलकर, अजित भुवड, शालिनी शितप यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.













