खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

आबलोली (संदेश कदम)

शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांच्या खेड तळे या गावात शिमगोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पवित्र आणि पारंपारिक शिमगो उत्सवा निमित्त श्री.वाघजाई देवी, श्री. कलमजाई देवी, श्री काळकाई देवी आणि श्री. सोमेश्वर देव यांच्या पालख्यांचे वाडी – वस्तीवर घरो – घरी जल्लोषात आणि उत्साहात आगमन झाले देवीच्या पालखीला खांदा देण्याचे आणि पालखी नाचवण्याचे भाग्य सर्वांनाच लाभले. हि आयुष्यातील अविस्मरणीय घटना असून धन्य करणारी अनुभूती अनुभवायला मिळत होती. यावेळी गावातील सर्व भक्तांनी आणि भाविकांनी देवी – देवतांचा जयघोष करत पालखीला खांद्यावर घेऊन नाचवले वर्षातून एकदा देव, देवता भक्तांच्या दर्शनासाठी, भक्तांच्या भेटीसाठी वाडी – वस्तीवर घरो – घरी येतात. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीने वाजत गाजत देव-देवतांच्या पालखींचे जल्लोषात स्वागत केले जाते. यावेळी गुळालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी होते. ठिक ठिकाणी महिला भगिनी देवी देवतांची आरती करून स्वागत करतात एकूणच भक्तांच्या आनंदाला उधाण आलेले असते. यावेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांच्यासह अनेकांनी पालखी नाचून आपला आनंद द्विगुणित केला आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें