नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन ८ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक येथील भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा, हक्क आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करणारी चर्चासत्रे, आरोग्यविषयक सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम अधिवेशनात आयोजित करण्यात आले. अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेला महाराष्ट्रातील उत्कृष्ट संघ म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी कालिकामंदिरापासून मुंबई नाका आणि बावानगर मार्गे दादासाहेब गायकवाड सभागृहापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभाकर क्षीरसागर यांनी शोभायात्रेचे नियोजन केले. फेस्कॉम महाराष्ट्राचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अरुण रोडे आणि अशोक होळकर यांनी शपथवाचन केले. महापौर हिमगौरी आहेर आडके, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार राजाभाऊ बाजे, खासदार भास्करराव भगरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार सरोजिनी आहिरे, आमदार राहुल डिकले आणि आमदार किशोर दराडे यांची उपस्थिती अधिवेशनाला लाभली. आयस्कॉनचे जीवन अध्यक्ष दिगंबर ना. चापके यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. स्वागताध्यक्ष म्हणून दिनकर पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. प्रास्ताविक अशोक तेरकर यांनी केले. अधिवेशनात महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. फेस्कॉमच्या संकेतस्थळ आणि ॲपचे उद्घाटनही करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त निवडक महिलांचा सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन सत्रांमध्ये विविध मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर विचार मांडले. आमदार राहुल डिकले, आमदार सरोजिनी आहिरे, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, खासदार भास्करराव भगरे, खासदार राजाभाऊ बाजे आणि खासदार शोभाताई बच्छाव यांनी मनोगते व्यक्त केली. नाशिक प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक नाना होळकर, सचिव धनंजय चतुर आणि कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात निर्मला भोसेकर यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंढे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. समाजकल्याण विभागाचे उपायुक्त माधवराव बाघ यांनी शासनाच्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभाकर क्षीरसागर आणि एस. आर. शिंदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आरोग्यविषयक सत्रांना अधिवेशनात विशेष प्रतिसाद मिळाला. मानवता किम्स हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ञ राज नगरकर यांनी कॅन्सरविषयक माहिती देत प्रतिबंध आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केले. ‘फेस्कॉम काल, आज व उद्या’ या विषयावरील चर्चासत्रात डी. एन. चापके, अरुण रोडे, अशोक नाना होळकर आणि सुरेखा देशमुख यांनी सहभाग घेतला. व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनातील वाटचाल या विषयावर माजी पोलीस अधिकारी बी. जी. शेखर यांनी मार्गदर्शन केले. अशोका हॉस्पिटलचे राहुल सुपे यांनी अस्थिरोगविषयक माहिती दिली. सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक तेरकर होते. सुप्रसिद्ध सिनेकलावंत मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता चतुर आणि प्रभाकर गुमास्ते यांनी केले.
दुसऱ्या दिवशी नेत्रतज्ञ शरद पाटील यांनी नेत्रआरोग्याविषयी मार्गदर्शन केले. चौदा प्रादेशिक विभागांच्या अध्यक्षांनी अधिवेशनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि २००७ चा आई-वडील पालनपोषण कायदा या विषयावर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलतराव जाधव यांनी माहिती दिली. आरोग्यविषयक सत्रात मानसी गुजराथी यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील उत्कृष्ट संघ म्हणून मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते आणि मुंबई फेस्कॉमचे अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष मोहन कटारे, उल्हास हरमळकर, विमल माळोदे आणि सुमंगल गुरव यांनी पुरस्कार स्वीकारला. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना याबाबत पंकज दाभाडे आणि अरुण रोडे यांनी माहिती दिली. समारोप सत्रात अण्णासाहेब टेकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. समारोपानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. प्रथम क्रमांक ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये आणि तृतीय क्रमांक २००० रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

In the

“Form is among the most strong means We’ve noticed in 16june my personal profession as the a doctor,” told you...
Read More

Down load Personify Wellness App You

ContentTreatment Manager effortsCodevista Services It helps users get quick, consistent tips to improve their bodies. That’s in conjunction with the...
Read More

कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश...
Read More
कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप

  पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप विकी डिंगणकर व सिद्धेश हुमणे यांची पोलीस...
Read More
पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण   राजापूर -  राजापूर तालुक्यातील...
Read More
राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ!     आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

  न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान; इयत्ता ५...
Read More
न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More