गुहागर जामसूत येथील ८० वर्षाच्या आई श्रीमती. भागीरथी सिताराम कोळथरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आलेल्या प्रत्येकाला भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडीचे सुपुत्र आणि ओम साई डेकोरेटर्स डोंबिवली चे मालक श्री नामदेव, मंगेश, प्रदीप, आणि रामचंद्र कोळथरकर यांच्या मातोश्री श्रीमती भागीरथी सीताराम कोळथरकर यांचा ८० वा अभिष्टचिंतन सोहळा (सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा) रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी हनुमान मंदिर जांभुर्णेवाडी येथे अतिशय सुंदर नियोजनात पार पडला.. या सोहळ्याला सर्व स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या समारंभासाठी रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाषराव गुडेकर, समाजसेवक श्री जनार्दन मालवणकर, श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष श्री महेश पडवेकर, जिल्हा संघटक व संभाजी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा यशवंत पालकर (नाना), सचिव सुधीर जामसुतकर, अमित बुरबाडकर, अनिल पडवेकर, जामसुद गावचे सरपंच श्री शैलेश साळवी, किशोर साळवी, संजय सावंत,संजय सुर्वे, सुधाकर निवळकर,गजानन पालकर ,सुरेश पाटील,शाम नार्वेकर,किशोर म्हात्रे,अजित खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होती. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुनील गुढेकर यांनी केले.
आपल्या आईच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आईचा लाडका मुलगा. श्री मंगेश कोळथरकर,आशिष कोळथरकर आणि सुन स्मिता कोळथरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे कोळथरकर परिवारातील सर्व सुना आणि नातवंडांनी आपल्या आईसाठी सुंदर गीतांवर नृत्य करत आपल्या आईसाठी असलेल्या भावना व्यक्त केल्या तसेच आलेल्या मान्यवरांनी सुद्धा आईप्रति आपल्या भावना बोलून दाखवल्या.
आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करून त्यांना भेट वस्तू प्रदान करून एक चांगला आदर्श कोळथरकर बंधूंनी संपूर्ण गावासमोर, समाजासमोर ठेवला आहे त्यामुळे त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.















