नालासोपारा (प)कडील जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महापौरांना मागण्यांचे निवेदन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नालासोपारा (प)कडील जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महापौरांना मागण्यांचे निवेदन

नालासोपारा – संदीप शेमणकर
दि. ४ मार्च २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नालासोपारा पश्चिमतर्फे
उपशहरप्रमुख श्री. कृष्णा दिनकर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर श्री. अजीव पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र. १४) येथील नागरिकांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी
नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र. १४) येथे स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत व उत्तम वातावरण मिळावे यासाठी सार्वजनिक ग्रंथालय-अभ्यासिका उभारणे, पाटणकर पार्क, रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ VVMC ने आधीच आरक्षित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळाचे मैदान व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याचा व विश्रांतीचे गार्डन विकसित करणे,
नालासोपारा पश्चिम स्टेशन रोडवरील गॅलेक्सी प्लाझा हॉटेल चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणे,
पाटणकर पार्क सिग्नलच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी कमतरता असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी नवीन स्वच्छतागृहांची उभारणी करणे,
नालासोपारा पश्चिम (प्रभाग क्र.१४) चक्रधर नगर येथील सध्या ‘नाना नानी पार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गार्डनला स्व. संतोष टेंबवलकर (माजी शहरप्रमुख – शिवसेना उबाठा) यांचे नाव देण्यात यावे आदी विविध महत्त्वाच्या मागण्या यावेळी महापौर श्री अजीव पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडण्यात आल्या
आम्ही विरोधी पक्षात असूनही जनतेच्या विकासासाठी व कल्याणासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नालासोपारा पश्चिम – प्रभाग क्र. १४) यांच्या वतीने सांगण्यात आले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेला मोठी चालना सिंधुदुर्ग: महाराष्ट्र दिनाचे...
Read More
महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी. नवीमुंबई (मंगेश जाधव) डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या...
Read More
पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20...
Read More
सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर...
Read More
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा