तेजस्वी कन्ना कांबळे यांना राज्यस्तरीय ‘राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६’

तेजस्वी कन्ना कांबळे यांना राज्यस्तरीय ‘राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६’

 

नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सोहळा; संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

नवी मुंबई : दिशा महाराष्ट्रची (YouTube व वेब पोर्टल) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सानपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन परिसरात भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तेजस्वी कन्ना कांबळे यांना “राज्यस्तरीय राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे ५० नामवंत महिलांचा “राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा” तसेच “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

तेजस्वी कांबळे यांच्या संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमाला दिशा महाराष्ट्राचीचे संपादक तुषार नेवरकर, सौ. सपना नेवरेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें