रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक निवड परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक


लांजा प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शिक्षण विभागातील समुदाय साधन केंद्र समन्वयक तथा केंद्रप्रमुख पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी जाहीर झाला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील संजय दळवी यांनी उल्लेखनीय यश संपादन करत 200 पैकी 148 गुण मिळवून 30वा रॅंक प्राप्त केला आहे.

जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये एकूण 115 केंद्रप्रमुख पदांची भरती होणार असून, दळवी यांच्या या यशामुळे त्यांच्या निवडीची शक्यता बळावली आहे. याशिवाय त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) च्या दुसऱ्या पेपरमध्येही 95 गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

संजय दळवी यांनी साटवली केंद्रातील शाळेत सात वर्षे सेवा बजावली असून सध्या ते माजळ शाळेत विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. तसेच साटवली केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी नासा भेट शिक्षक निवड परीक्षेतही त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत निवड मिळवली होती, ही बाब त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.

संजय दळवी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें