वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरी :- निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मनोहर इनामे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची प्रेरणादायी परंपरा सुरू केली आहे. यावर्षी त्यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र अभ्यास परीक्षा आयोजित केली.
ही स्पर्धा १४ मार्च रोजी पार पडली असून वाढदिवसाच्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ उत्साहात करण्यात आला . तालुका जिल्हा स्थरावर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम 10 क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, पालक, तसेच इतर शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करणे आणि शिवचरित्रातून प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे इनामे सरांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक म्हणून अशा प्रकारचा उपक्रम राबवून मनोहर इनामे यांनी इतर शिक्षकांनाही प्रेरणा दिली असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें