जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

जैतापूर दि. २७ (प्रशांत पोवार )

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे तसेच गावातील एकोप्याचे दर्शन घडवणारे ‘सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२६’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर नं. १ येथे बुधवारदि.२५ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जैतापूर गावच्या उपसरपंच सौ. मिनल मांजरेकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी गावातील तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये सौ. दीपा मांजरेकर (पोलीस पाटील), श्री. अरुण सुर्वे सर (केंद्रप्रमुख, कुवेशी केंद्र), सौ. स्वरांजली करगुटकर (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), श्री. परेश भाटकर (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), श्री. राजन लाड (पत्रकार), सौ. राजश्री नारे (मुख्याध्यापक, जैतापूर हायस्कूल) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य श्री. दिवाकर आडविरकर गुरुजी, श्री. सिकंदर करगुटकर, सौ. आराध्या मांजरेकर तसेच श्री. गिरीश करगुटकर, श्री. राकेश दांडेकर, श्री. सुनील करगुटकर आणि श्री. प्रसाद मांजरेकर उपस्थित होते. यावेळी सहकारी शिक्षक श्री. मंगेश मातले सर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत कांबळे सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी सादर केली. लोकनृत्ये, नाटिका, देशभक्तीपर गीते आणि सामाजिक संदेश देणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. लहानग्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सादरीकरणातील समन्वय आणि विषयांची निवड यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. कुणकवळेकर सर व शुभांगी यादव मॅडम यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. प्रितेश देवळेकर यांनी केले, तर युट्यूब लाइव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी श्री. राजन लाड यांनी पार पाडली.

कार्यक्रमाच्या शेवटी विशेष सहकार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. प्रशांत कांबळे सर यांनी केले. या उत्साहपूर्ण स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें