प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर अभिनंदनाचा वर्षाव

आबलोली (वार्ताहर, संदेश कदम): गुहागर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘प्लाइट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट’, शृंगारतळी आणि ‘युनिटेक कम्प्युटर एज्युकेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा ‘प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे येथील दहावीची गुणवंत विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने या पुरस्कारावर आपले नाव कोरले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान

शृंगारी उर्दू हायस्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी पारितोषिक वितरण आणि ‘पेटंट’ या विषयावरील मार्गदर्शन शिबिराचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न झाला. समृद्धीला प्रशस्तीपत्र, गौरव चिन्ह, पुस्तक, शालेय उपयोगी वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:

* प्रा. सुहास वाघमोडे: पेटंट प्रदानित प्राध्यापक, डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण.

* प्रा. जहूर बोट: संस्थापक, युनिटेक कम्प्युटर.

* सुदेश कदम: अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ.

* श्री. पाटील व श्री. शिवणकर: गुहागर तालुका विज्ञान मंडळ (अध्यक्ष व सचिव).

* शगुप्ता मॅडम: मुख्याध्यापिका, शृंगारी उर्दू हायस्कूल.

* श्री. राऊत: मुख्याध्यापक, देवघर हायस्कूल.

* याशिवाय मुनवर शेख, विलास लादे आणि जिल्हा सदस्य श्री. घुटुकडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

समृद्धी आंबेकरच्या या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका एस.एस. चव्हाण, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार आणि ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तिच्या या यशामुळे पाटपन्हाळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें