गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन
पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक
गुहागर, ता. १ : तालुक्याच्या माजी सभापती श्रीमती. सुचिता सुशील वेल्हाळ यांचे आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी शृंगारतळी येथे दुःखद निधन झाले. त्या पं. स. सदस्य श्री. गौरव सुशील वेल्हाळ यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या अंत्ययात्रा शृंगारतळी येथील राहत्या घरातून सायंकाळी ७ नंतर श्मशानभूमीकडे निघणार आहे.
श्रीमती. सुचिता वेल्हाळ या सामाजिक कार्यकर्ते के. सुशील अप्पा वेल्हाळ यांच्या पत्नी होत्या. त्यांनी भारतीय जनता पक्षात सभापती म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता व त्या महिला जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या.
तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या कार्यामुळे त्या महिला वर्गात विशेष लोकप्रिय होत्या.
त्यांच्या निधनामुळे गुहागर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.















