पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित सोहळा निलमहल हॉल, हॉटेल ग्रीन सिग्नल, डेक्कन, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात रवींद्र धारिया — अध्यक्ष, वनराई निसर्ग पर्यावरण सेवा, श्रीपाद कुलकर्णी — प्रसिद्ध लेखक, कवी व पत्रलेखक, कविराज विजय सातपुते — सुप्रसिद्ध साहित्यिक, निरज सबनीस — व्यंगचित्रकार, तसेच पूजा प्रतुल जागडे — नागरिक सुजीवनार्थ कार्यरत यांचा विशेष सत्कार होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती कटके राहणार असून, जयप्रकाश नेऊरगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा अधिक उंचावणार आहे.

या कार्यक्रमासाठी पुणे आयोजन समितीमध्ये लहू काळे, तपेंद्र सुनार, राजे जयगडी, सोहम पाटील, कृष्णा चौधरी, निखिल घायावट, प्रणित चव्हाण, नितीन उपाध्याय, दिक्षात अंबुरे, माधुरी ओरसे, नम्रता ओरसे, कोमल जाधव, दिशा चौधरी, श्रीवल्लभ कुलकर्णी, श्रेयस क्षीरसागर, आदित्य शेलार, तनिष्क पाठक, वर्षा खेडकर, केदार शेळके, निलेश, हेमंत गवळी, विजय झोरे आणि मोनिका आढाव यांचा समावेश आहे.

पुणे कौन्सिलमध्ये योगेश देशपांडे, चारुता आपटे, डॉ. स्नेहल तावरे, सुमंगला बाकरे, प्रा. संजय पवार, समता नंदा, सोनाली कुलकर्णी, सुरेश सुतार, सनील गाडेकर, जगदीश पाटील, महेंद्र म्हस्के, तहेसीन चिंचोलकर, डांगी, ललित दिवेकर, शहा, कालिमोहनानंद, डॉ. सुरेश देशमुख, प्रियांका जोशी, आकाश मोरे आणि मानसी भोसले यांचा सहभाग आहे.

या सोहळ्यास लॉर्ड हिल्स, लाईफस्टाईल रिसोर्ट इंटरनॅशनल कॉम्म्युन, आरके, मॉर्फियन, नेस्ले आणि एआरसीटेकी यांचे सहकार्य लाभले आहे. विविध क्षेत्रांतील गुणवंतांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने आयोजित हा पुरस्कार सोहळा पुण्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें